मुंबई- राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने महापौर बसवला हा
शिवसेनेला धक्का वगैरे असल्याचे लिहिले आणि बोलले जात आहे. शिवसेनेला धक्का वगैरे
बसण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला मिळणारच होता. २०१४ साली याच
राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता.
म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत
असे ते उगाच सांगत असतात. असा घणाघात शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रवादीवर केला आहे.
एकीकडे भाजपविरोधात समविचारी
पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं असताना अहमदनगर महापौर
निवडणुकीतली ही भाजप-राष्ट्रवादीची ही यारी-दोस्ती लक्षणीय ठरली. देशासह राज्यात
आघाडी-महाआघाडीचे वारु दामटवण्याचा प्रयत्न सुरु असताना अहमदनगरने मात्र वेगळंच
राजकीय वळण घेतलं. अहमदनगर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला बाजूला
सारत भाजपनं राष्ट्रवादीच्या साथीनं सत्ता मिळवली आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये
संताप आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी आज या
संताप व्यक्त केला आहे.